तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? या प्रश्नावर नरहरी झिरवळ मिश्किलपणे म्हणाले…
VIDEO | राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल येण्यापूर्वीच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान, काय म्हणाले बघा...
नाशिक : तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का? असा सवाल राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. केलं तर मी आजही मुख्यमंत्री होऊ शकतो. पण त्यासाठी संख्याबळ हवं ना. माझे कधीच होर्डिंग्ज लागणार नाहीत. लागले तर तुमचे आशीर्वाद पक्के असं समजायचं. स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. खुर्ची रिकामी नाहीये. पण सत्ता संघर्षावर लोकांचा तर्कवितर्क आहे. जर तरचा प्रश्न आहे. त्याला काही अर्थ नाही, असंही ते म्हणाले. तर राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल येण्यापूर्वीच नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. माझ्याकडे त्या आमदारांचं प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच करेन, असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे. झिरवळ यांच्या या विधानाने सर्वानाच आश्चर्य वाटले असून आता सर्व लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागलं आहे.