सेनेतील बंडाबाबत मी आधीच इशारा दिला होता- आमदार आशिष जैस्वाल
शिवसेनेमध्ये बंड होईल असा इशारा मी आधीच दिला होता असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार आशिष जैस्वाल यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
शिवसेनेमध्ये बंड होईल असा इशारा मी आधीच दिला होता असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार आशिष जैस्वाल यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून आम्ही अडीच वर्षे गप्प बसलो होतो, मात्र अडीच वर्षांनंतर नाईलाजानं उठाव केला, असंदेखील जैस्वाल यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी जैस्वाल यांनी भास्कर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “याला बंड नका म्हणू, हा उद्रेक होता. ज्या दिवशी विधान परिषदेची निवडणूक झाली, त्यादिवशी हा उद्रेक झाला. 90 टक्के आमदार नाखूष होते. भाजप-सेना युतीसाठी आम्ही उद्धव ठाकरेंची मनधरणी केली होती. मात्र भास्कर जाधवांमुळे उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यात अपयश आलं”, असं जैस्वाल म्हणाले.
Published on: Jul 08, 2022 01:59 PM
Latest Videos