VIDEO : Rupali Patil Exclusive | कुठल्या पक्षात जायचं अद्याप ठरवलं नाही, मात्र मनसेला रामराम : रुपाली पाटील

VIDEO : Rupali Patil Exclusive | कुठल्या पक्षात जायचं अद्याप ठरवलं नाही, मात्र मनसेला रामराम : रुपाली पाटील

| Updated on: Dec 15, 2021 | 1:36 PM

मी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवासेनेचे नेते वरुण देसाई यांची भेट झाली, ती भेट ही सदिच्छा भेट असल्याचेही रुपाली ठोंबरे-पाटील  यांनी म्हटलं आहे. तसेच कुठल्या पक्षात जायचं अद्याप ठरवलं नाही, मात्र मनसेला रामराम आहे असेही रुपाली पाटील म्हणाल्या. 

राज ठाकरे माझ्या ह्रदयात राहतील ते माझे दैवत होते आहेत आणि राहतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका मी जाहीर करेल. काल मुंबई येथे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेले होते. वैजापूर येथील ऑनर किलिंगच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवासेनेचे नेते वरुण देसाई यांची भेट झाली, ती भेट ही सदिच्छा भेट असल्याचेही रुपाली ठोंबरे-पाटील  यांनी म्हटलं आहे. तसेच कुठल्या पक्षात जायचं अद्याप ठरवलं नाही, मात्र मनसेला रामराम आहे असेही रुपाली पाटील म्हणाल्या.