Nawab Malik | मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही : नवाब मलिक
मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, तसेच कोणावरही दबाव टाकून कोणत्याही प्रकारची संपत्ती घेतलेली नाही, असा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. माय मराठीची क्षमा मागून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात राष्ट्रभाषेत करणार आहोत. मी एक घोषणा केली होती दिवाळीनंतर काही गोष्टी समोर आणणार आहे. उशीर झाला, काही लोकांच्या पत्रकार परिषद सुरु होत्या. मी जे सांगणार आहे ती सलीम जावेद यांची कथा नाही. तो इंटरवल नंतरचा चित्रपट नाही. हा एक देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, तसेच कोणावरही दबाव टाकून कोणत्याही प्रकारची संपत्ती घेतलेली नाही, असा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.