Chandrakant Patil Live | मला माजी मंत्री म्हणू नका, मी तसं म्हणालोच नव्हतो, चंद्रकांतदादांची कोलांटउडी
मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू चंद्रकांतदादांनी संकेतच दिले होते. पण आता 'मला माजी मंत्री म्हणू नका असं काही मी म्हणालोच नव्हतो', अशी कोलांटउडी त्यांनी मारली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले होते. पण आता ‘मला माजी मंत्री म्हणू नका असं काही मी म्हणालोच नव्हतो’, अशी कोलांटउडी मारत त्या विधानामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला आहे.
पुण्यात कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विधानासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, “मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एका प्रसंगावेळी माजी मंत्री बाळा भेगडेंना उद्देशून मी म्हणालो होते, कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली”