Sanjay Raut: इच्छा नसताना रोज सकाळी मी बोलतो, राऊत असं का म्हणाले?
समोरच्या लोकांची ताकद आणि त्यांच्या भूमिका त्यानुसार आपल्या लोकांना तयार करावं लागेल. सैन्य पोटावर चालतो. शिवसेनाप्रमुखांच्या काळात एक पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती. आता युद्ध वडापाववर होणार नाही. आता आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या हातात, असे म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई : शिवसेनेच्या भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणून शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ओळखलं जातं. सामनातून आपल्या लेखातून आणि रोज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून राऊत नेहमीच भाजपवर तुटून पडतात. आज पुन्हा तेच दिसून आलं आहे. संजय राऊतांनी आज पुन्हा चौफेर बॅटिंग करत भाजपवर (BJP) सडकडून टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकातही भाजप नेत्यांनी सोशल मीडियाचं ट्रेनिंग दिलं. हिजाबपासून अनेक मुद्दे त्यांनी प्रचारात आणले. त्या मानाने आपली टीम लहान आहे. परत सांगतो. हे युद्ध आहे. हे राज्य टिकवायचं असेल या प्रवृत्ती विरुद्ध लढायचं असेल तर समोरच्या लोकांची ताकद आणि त्यांच्या भूमिका त्यानुसार आपल्या लोकांना तयार करावं लागेल. सैन्य पोटावर चालतो. शिवसेनाप्रमुखांच्या काळात एक पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती. आता युद्ध वडापाववर होणार नाही. आता आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या हातात, असे म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.