Chhatrapati Sambhajiraje | आमची टीम करते आहे, मी पण मदतीसाठी कोल्हापुरात जाणार : छत्रपती संभाजीराजे
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलं आहे.
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलं आहे. तर पावसाचं पाणी हायवेवर आल्याने या हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. कोल्हापूर हायवेर 20 किलोमीटरची भलीमोठी रांग लागली आहे. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि कोल्हापूरमधील परिस्थिती बिकट आहे. कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 50 फुटांवर पोहोचली असून सांगलीतल्या नदीकाठी असणाऱ्या काही भागात नदीचे पाणी शिरले आहे. सांगलीतल्या बाजारपेठांमधला काही भाग सध्या पाण्याखाली आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने सांगली शहरातून कोल्हापूरकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली आला आहे. त्यामुळे इथली वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आलीय. काही रस्ते पाण्याखाली आल्याने पर्यायी मार्गाचा विचार केला जातोय. पण कालपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, मदतकार्यासाठी आपण कोल्हापूरला जाणार असल्याचे खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितले.