अमित शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल नेमकं काय?
टीव्ही ९ नेटवर्कला महामुलाखत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन दिवस झालेत. पण मोदींनी टीव्ही ९ सोबत जी मन की बात केली. त्यावरून राज्याच्या राजकारणात काही गटात चलबिचल सुरू झाली आहे. कारण मोदींनी ठाकरेंबद्दल काही साधं वक्तव्य केले नाही. ठाकरेंबद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्यावर खुद्द शरद पवार यांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना अडचणीत असताना मदत करणारा पहिला मीच असेल असं वक्तव्य केलं. त्यावरून शरद पवार अलर्ट झाल्याचे पाहायला मिळत आहे. टीव्ही ९ नेटवर्कला महामुलाखत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन दिवस झालेत. पण मोदींनी टीव्ही ९ सोबत जी मन की बात केली. त्यावरून राज्याच्या राजकारणात काही गटात चलबिचल सुरू झाली आहे. कारण मोदींनी ठाकरेंबद्दल काही साधं वक्तव्य केले नाही. ठाकरेंबद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्यावर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी मदत करण्याची वेळ ठाकरेंवर येऊ नये, अशी प्रार्थनाच शरद पवार यांनी केली आहे. टीव्ही ९ च्या महामुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षफुटीवर सवाल केलेत. उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र असल्याने त्याचा आदर तर आहे. तर जेव्हा उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा त्यांना मदत करणारा पहिला मीच असेल, असेही मोदी म्हणाले. बघा नेमकं काय म्हणाले मोदींच्या वक्तव्यावर शरद पवार?