“ट्रेलर, टिझर नाही तर २२ मार्चला थेट सिनेमाच दाखवणार..”, राज ठाकरे यांचा नेमका रोख कुणाकडे?
VIDEO | असा महाराष्ट्र कधीच नव्हता, राजकारणाचा चिखल झालाय; काय म्हणाले राज ठाकरे बघा व्हिडीओ
पनवेल : राज्यात जे काही घडलं व घडत आहे, त्याचा ट्रेलर, टिझर नाही काही नाही तर थेट सिनेमाच दाखवायचा आहे. २२ मार्च रोजी मी माझी सविस्तर भूमिका मांडणार आहे. सध्या मी या विषयावर काही बोलणार नाही, मात्र इतकेच म्हणेन की राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मनसेच्या वतीने पनवेलमध्ये राजभाषा सप्ताहाचे आयोजन करण्या आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी त्यांनी म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं पण काळ सोकावतो, असे म्हणत अजित पवार यांनी ‘जर मनसेचे एका आमदाराने उद्या पक्ष ताब्यात घेतला तर काय?’ या केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
Published on: Feb 27, 2023 11:00 PM
Latest Videos