IND vs NZ World Cup Semi Final : भारत वि. न्यूझीलंड सामना, राजकीय मंडळींसह सेलिब्रेटींची हजेरी, कोण-कोण होतं उपस्थित?

IND vs NZ World Cup Semi Final : भारत वि. न्यूझीलंड सामना, राजकीय मंडळींसह सेलिब्रेटींची हजेरी, कोण-कोण होतं उपस्थित?

| Updated on: Nov 16, 2023 | 12:26 PM

भारत विरूद्ध न्यूझीलंड अशा संघात रंगलेल्या सामन्याला क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने तब्बल ७० धावांनी विजय मिळवला. इतकंच नाही तर या सामन्याला राजकीय वर्तुळातील नेते मंडळींपासून सेलिब्रेटींची उपस्थिती पाहायला मिळाली.

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ : भारत आणि न्यझीलंडमध्ये बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने तब्बल ७० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या यासामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ३९८ धावा केल्या. तर या धावांचं आव्हान डोळ्यांसमोर ठेवून न्यूझीलंड संघानं ३२७ धावा केल्यात. या सामन्यात भाव खाऊन गेला तो म्हणजे मोहम्मद शमी… मोहम्मद शमीने सात विकेट घेत या सामन्यात शमी जादूगार ठरला. तर भारत विरूद्ध न्यूझीलंड अशा संघात रंगलेल्या सामन्याला क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. इतकंच नाही तर या सामन्याला राजकीय वर्तुळातील नेते मंडळींपासून सेलिब्रेटींची उपस्थिती पाहायला मिळाली. राजकीय वर्तुळातील नेत्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तेजस ठाकरे, अमित ठाकरे यासह काही नेते तर सेलिब्रेटींमध्ये रजनीकांत, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम हे हजर होते.

Published on: Nov 16, 2023 12:26 PM