राज्यसभेचे खेळाडू लोकसभेच्या मैदानात? भाजपकडून अशोक चव्हाण राज्यसभेचे उमेदवार तर लोकसभा कोण लढवणार?

राज्यसभेचे खेळाडू लोकसभेच्या मैदानात? भाजपकडून अशोक चव्हाण राज्यसभेचे उमेदवार तर लोकसभा कोण लढवणार?

| Updated on: Feb 13, 2024 | 11:18 PM

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर राज्यसभेचे विद्यमान खासदार नारायण राणे, पियूष गोयल, भागवत कराड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी मोठा निर्णय घेतल्याने काँग्रेसला धक्का बसला. अशोक चव्हाण यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर राज्यसभेचे विद्यमान खासदार नारायण राणे, पियूष गोयल, भागवत कराड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. राज्यसभेचे मंत्रिपद भूषविणारे भाजपचे कोणते मंत्री लोकसभा निवडणूक लढू शकतात? तर यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियूष गोयल आणि भागवत कराड हे लोकसभेच्या मैदानात उतरणार अशी माहिती आहे.

Published on: Feb 13, 2024 11:18 PM