‘… तर १२ आमदार, २ खासदार निवडून येतील’, प्रकाश आंबेडकर यांचा नेमका मोठा दावा काय?
VIDEO | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा हिंगोलीत मोठा दावा
हिंगोली : हिंगोली येथे बंजारा परिषदेचे आयोजन करण्यात आलं होत. या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, आता बंजारा समाजाचा दबदबा राहिला नाही, बंजारा समाजाने एकजूट दाखवली तर 12 आमदार आणि 2 खासदार निवडून येतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. वसंतराव नाईकाने तयार केलेला दबदबा कायम होता, मनोहर नाईकांपर्यंत ते चाललं, आज ते आजारी आहेत वय झालेल आहे आणि त्या कुटुंबामध्ये कलह आपल्याला दिसतोय. तेव्हा अशा परिस्थितीत कुठेही उधळून चालणार नाही. आता आपल्याला आपलं संरक्षण करावे लागेल. वसंतराव नाईकाचा कवच कुंडल होतं आता ते कवच कुंडल नाही म्हणून आपल्यालाच आपलं कवच कुंडल व्हावं लागेल हे लक्षात घेतलं पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Published on: Jun 11, 2023 02:04 PM
Latest Videos