NCP News | … तर ५ राज्यातील निवडणुकीच्या वेळी घड्याळ चिन्ह गोठवणार?
VIDEO | केंद्रीय निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. अशातच देशातील 5 राज्यातील निवडणुकीच्या वेळी घड्याळ चिन्ह गोठवणार? असल्याची चर्चा होतेय. पाच राज्यातील निवडणुकांवेळी का गोठवणार राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह ?
नवीदिल्ली, ९ ऑक्टोबर २०२३ | केंद्रीय निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार 7 नोव्हेंबरला मिझोराममध्ये मतदान होणार आहे. तर दोन टप्प्यात छत्तीसगडमध्ये मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशातही 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगनात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबर रोजी समोर येणार आहे. अशातच देशातील 5 राज्यातील निवडणुकीच्या वेळी घड्याळ चिन्ह गोठवणार? असल्याची चर्चा होतेय. जर निवडणुकी वेळी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाने उमेदवार दिल्यास चिन्ह गोठवण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.