पूर्वीचा मराठा आता शांत नाही, जरांगे पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर; सांगितली कशी असणार रणनीती
17 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी एक मिटींग बोलावली असल्याची माहिती दिली आहे. लवकरच या बैठकीची अधिकृत माहिती दिली जाईल. दरम्यान, सकाळी 9 ते 12 पर्यंत परिचय बैठक होणार आहे. तर 1 ते 3 वाजेपर्यंत मुख्य बैठक असणार आहे. यामध्ये कोण-कोणाचा असणार सहभाग?
छत्रपती संभाजीनगर, १४ डिसेंबर २०२३ : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 17 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी एक मिटींग बोलावली असल्याची माहिती दिली आहे. लवकरच या बैठकीची अधिकृत माहिती दिली जाईल. दरम्यान, सकाळी 9 ते 12 पर्यंत परिचय बैठक होणार आहे. तर 1 ते 3 वाजेपर्यंत मुख्य बैठक असणार आहे. यामध्ये राज्यभरातील मराठा समाजासह स्वयंसेवक, आयोजक, साखळी उपोषणकर्ते, डॉक्टर, वकील, अभ्यासक, साहित्यिक, इतिहास अभ्यासक हजर राहणार आहे. दरम्यान मराठा समाजाला 24 तारखेला सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढचं आंदोलन शांततेत असले तरी मोठं आंदोलन करण्यात येईल, यासंदर्भात येत्या 17 तारखेला आंदोलनाची पुढील रणनिती ठरविली जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मी माझा निर्णय समाजावर लादत नाही. कारण मी समाजापेक्षा मोठा नाही, मी मराठा सेवक आहे. दरम्यान सोशल मिडीयावर जे व्हायरल होत आहे ती समाजाची भावना खदखद असू शकते असे म्हटले आहे. तर यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले.