AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी चुकीचं पाऊल उचललं असतं तर एवढे लोक माझ्यासोबत आले असते का ? एकनाथ शिंदे यांचा सवाल

मी चुकीचं पाऊल उचललं असतं तर एवढे लोक माझ्यासोबत आले असते का ? एकनाथ शिंदे यांचा सवाल

| Updated on: Jan 06, 2024 | 4:34 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले शिवसंकल्प अभियान आज पासून सुरु केले आहे. त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपण चुकीचं पाऊल उचलले असते तर एवढे लोक आपल्याकडे आले नसते. आपण बाळासाहेबांचे विचार आणि पक्ष वाचविण्यासाठी हे सर्व केल्याचे त्यांनी सांगितले. सर्व जण सत्तेच्या दिशेने जात असतात. माझ्यासोबतचे लोक सत्ता सोडून आल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे | 6 जानेवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे शिवसंकल्प अभियान सुरु केले आहे. त्यांना यावेळी घेतलेल्या कार्यक्रमात आपले महायुतीत सामील होण्याचे पाऊल चुकीचे असते तर एवढे लोक माझ्यासोबत आले असते का ? आज शिवसेनेत अनेक जण प्रवेश करीत आहेत. परभणीच्या 50 नगरसेवकांना पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत रोज प्रवेश सुरु आहे. हजारो लाखो शिवसैनिक शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत आहेत. एका विश्वासाने हे होत आहे. जो विश्वास तुम्ही दाखविताय तो विश्वास सार्थ करण्याचे काम तुमचा एकनाथ शिंदे केल्या शिवाय रहाणार नाही असेही त्यांनी सांगितले. जी भूमिका मी घेतली ती अतिशय प्रामाणिक पणे पक्ष वाचविण्यासाठी घेतली. आज सत्तेवर कोणी लथ मारत नाही, माझ्या सोबत सात आठ मंत्री आले. सत्तेच्या दिशेने सर्वजण जात असतात. परंतू महाराष्ट्रात सत्ता सोडण्याचे काम बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी केले, पक्ष वाचविण्यासाठी केले. बंडखोरी करायची असती तर 2019 ला वेगळाविचार सुरु झाला तेव्हाच केली असती. बाळासाहेबांनी कधी सत्तेचे पद घेतले नाही. नाही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायची वेळ आली तेव्हा स्वत:च टुणकण उडी मारुन मुख्यमंत्री झाले. आमचे सरकार महिलांसाठी काम करीत आहे. एसटी प्रवासात महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास करता येत आहे. आता अंगणवाडी महिलांच्या समस्याही सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Jan 06, 2024 04:27 PM