Balasaheb Thackeray असते तर शिवरायांच्या पुतळ्याला कुणी बोटही लावू शकलं नसतं : Navneet Rana
जनतेची मागणी असल्यानं त्याठिकाणी पुतळा उभारण्यात आला. त्याला विरोध होत असेल, तर ते योग्य नाही, असंही नवनित राणा यांनी म्हंटलं. कुठे चाललाय महाराष्ट्र माझा, असा सवाल यावेळी खासदार नवनित राणा यांनी विचारला.
खासदार नवनित राणा (MP Navneet Rana) यांनी घराबाहेरून निघून कार्यकर्त्यांसोबत चांगल्याच घोषणा दिल्या. जय जय जय जय जय शिवाजी, जय जय जय जय जय भवानी, अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. पोलीस कार्यकर्त्यांना गाडीत कोंबत होते. कार्यकर्ते मात्र जोराजोरात घोषणाबाजी करत होते. आंदोलक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यासाठी पोलिसांनी गाड्या बोलावल्या होत्या. मुर्दाबाद, मुर्दाबाद उद्धव ठाकरे मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा नवनित राणा (Rana’s sloganeering) घराबाहेर पडून देत होत्या. कार्यकर्ते त्यांना साथ देत होते. पोलीसांनी जबरदस्त बंदोबस्त लावला. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना अटक करत होते. हे सर्व शिवप्रेमी आहेत, असं नवनित राणा म्हणाल्या.
नवनित राणा म्हणाल्या, कुठे चाललाय महाराष्ट्र माझा
आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो. जनतेची मागणी असल्यानं त्याठिकाणी पुतळा उभारण्यात आला. त्याला विरोध होत असेल, तर ते योग्य नाही, असंही नवनित राणा यांनी म्हंटलं. कुठे चाललाय महाराष्ट्र माझा, असा सवाल यावेळी खासदार नवनित राणा यांनी विचारला. विशेष म्हणजे प्रकरण चिघळू नये, यासाठी पत्रकारांना राणा दाम्पत्याच्या घरी जाण्यापासूनही थांबविण्यात आलं. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी नवनित राणा घराबाहेर आल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गेल्या तीन वर्षांपासून परवानगी मागतोय. तरीही परवानगी मिळत नाही. मग, शिवप्रेमी काय करणार, असंही त्या म्हणाल्या.