हिटलर की मौत मरेगा मोदी, काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांचं वादग्रस्त वक्तव्य
"मोदी हिटलरच्या मार्गावर चालू लागले तर हिटलरसारखाचा त्यांचा मृत्यू होईल. हे लक्षात ठेवा मोदी", असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. या वक्तव्यावरून वाद होताच त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी हिटलरचं नाव घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “हिटलरनेसुद्धा अशीच एक संस्था बनवली होती. ज्याचं नाव होतं खाकी. सैन्यदलात त्याने ही संस्था बनवली होती. मोदी हिटलरच्या मार्गावर चालू लागले तर हिटलरसारखाचा त्यांचा मृत्यू होईल. हे लक्षात ठेवा मोदी”, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. या वक्तव्यावरून वाद होताच त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी यांच्या योजनांवर प्रश्न उपस्थित केला जाईल, असं ते म्हणाले. अग्निपथ योजनेवरून सध्या देशभरात वाद सुरू आहे. यावरूनच सहाय यांनी मोदींवर टीका केली. सहाय यांच्या या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन म्हणाले की, प्रत्येक राजकीय नेत्याने केलेल्या टीकेवर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण, ते त्यांचं मत आहे.