राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार केला तर कारवाई का केली नाही? काँग्रेस नेत्याचा भापसह मोदींना सवाल
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजप-शिंदे युतीत जाण्याच्या मार्ग स्वीकारला. यावरून राष्ट्रवादी फोडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी खेळ खेळला तर सत्तेचा सारीपाठ मांडल्याच्या टीका होत आहेत. याचदरम्यान काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी यांच्यावर घणाघात केला.
कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजप-शिंदे युतीत जाण्याच्या मार्ग स्वीकारला. यावरून राष्ट्रवादी फोडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी खेळ खेळला तर सत्तेचा सारीपाठ मांडल्याच्या टीका होत आहेत. याचदरम्यान काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी यांच्यावर घणाघात केला. त्यांनी ईडीचा वापर लोकांना ब्लँकमैल करण्यासाठी केला जात असल्याचं म्हणताना मविआत फुट पाडण्यासाठीच भाजपानं सध्याचं राजकारण केल्याची टीका केली. त्याचबरोबर मोदींनी स्वतः महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला होता. त्यांनी राज्य सहकारी बँकेचा घोटाळा, सिंचन घोटाळा, याच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं घेतली होती. जर तुम्हाला वाटतं राष्ट्रवादीनं भ्रष्टाचार केला. तर त्यांनी चौकशी करा? त्यांना तुम्ही अटक का करत नाही? उलट भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतलं जात असल्याचं सध्याचं राज्यातील चित्र असल्याचंही ते म्हणालेत.