“शरद पवार राष्ट्रपती होत असतील तर…”, छगन भुजबळांनी व्यक्त केलं मत
नाना पाटोले यांनी शरद पवार राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार झाल्यास आमचा पाठिंबा असेल असं वक्तव्य केलंय. त्यांनी या संदर्भात ट्विट देखील केलंय.येत्या 15 जूनला तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जींनी याच विषयासंदर्भात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावलीये.
मुंबई: राष्टपतीपदासाठी (President) 18 जुलैला निवडणूक होणार. राजकीय वर्तुळात (Political Circle) याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी शरद पवार राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार झाल्यास आमचा पाठिंबा असेल असं वक्तव्य केलंय. त्यांनी या संदर्भात ट्विट देखील केलंय.येत्या 15 जूनला तृणमूल काँग्रेस (TMC) नेत्या ममता बॅनर्जींनी याच विषयासंदर्भात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावलीये. दरम्यान नाना पटोलेंनंतर छगन भुजबळ यांनी देखील राष्ट्रपती पदाबद्दल वक्तव्य केलंय. त्यांनीही या पदासाठी पवार राष्ट्रपती होत असतील तर ती आनंदाचीच गोष्ट असेल, असं म्हटलं आहे.
Published on: Jun 12, 2022 07:14 PM
Latest Videos