… तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
समजोता व्हायला वेळ लागत असेल तर मग आपण दोघं जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करायचा. राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येत असेल तर त्यांना पण सोबत घेऊ, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता जागा वाटपाचा बॉल हा ठाकरे, शिवसेना यांच्या कोर्टात असल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले
मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्ही ४८ जागा लढवू असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर एकत्र लढणार असल्याचे वर्षभर जाहीर केलं होतं. मविआतील नेत्यांशी जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलून घ्यावं, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. समजोता व्हायला वेळ लागत असेल तर मग आपण दोघं जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करायचा. राष्ट्रवादी, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येत असेल तर त्यांना पण सोबत घेऊ, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता जागा वाटपाचा बॉल हा ठाकरे, शिवसेना यांच्या कोर्टात असल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. जर त्यांनी यासंदर्भातील निर्णय घेतला नाही तर आम्ही ४८ च्या ४८ जागा लढवू, असेही स्पष्ट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर आमचा प्रयत्न असा आहे की, समजोता करून निवडणूक लढू पण तसं झालं नाही तर ४८ जागा लढवू असा त्यांनी पुनरूच्चार केला.