तर काँग्रेसऐवजी ठाकरे अन् पवार एकत्र लढणार? मविआचा फॉर्म्युला 5 राज्यांच्या निकालात दडलाय?

तर काँग्रेसऐवजी ठाकरे अन् पवार एकत्र लढणार? मविआचा फॉर्म्युला 5 राज्यांच्या निकालात दडलाय?

| Updated on: Nov 16, 2023 | 10:55 AM

मविआतील फॉर्म्युल्यावर ३ डिसेंबरनंतर काँग्रेस महाराष्ट्रातील जागांवर अधिकृतपणे दावा करणार आहे. याचं कारण म्हणजे ५ राज्यांचे निकाल त्यांच्यासाठी चांगले ठरले तर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते. मविआत काँग्रेसला अपेक्षित जागा न मिळाल्यास ठाकरे गट आणि शरद पवार गटही एकत्रित लढू शकेल.

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | महाविकास आघाडीमध्ये संभाव्य फॉर्म्युल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेस जागा वाटपसाठी ३ डिसेंबरची वाट पाहतंय. कारण ५ राज्यांच्या निकाल लागल्यानंतरच यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये संभाव्य फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. मात्र यामध्ये काँग्रेस निरूत्साही दिसतंय. सुत्रांच्या माहितीनुसार, ३ डिसेंबरनंतर काँग्रेस महाराष्ट्रातील जागांवर अधिकृतपणे दावा करेल. याचं कारण म्हणजे ५ राज्यांचे निकाल त्यांच्यासाठी चांगले ठरले तर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते. म्हणून काँग्रेस यासंदर्भात डिसेंबरमध्ये निर्णय होईल असे म्हणताय. मविआत काँग्रेसला अपेक्षित जागा न मिळाल्यास ठाकरे गट आणि शरद पवार गटही एकत्रित लढू शकेल. प्राथमिक माहितीनुसार, मविआतला संभाव्य फॉर्म्युल्यानुसरा, ठाकरे गट १९-२०, काँग्रेस १३-१५, राष्ट्रवादी १०-११ जागा लढवू शकते. मात्र या संभाव्य फॉर्म्युल्यावर फेरविचाराला बळ मिळावं, म्हणून काँग्रेस ३ डिसेंबरनंतर दावा करणार आहे.

Published on: Nov 16, 2023 10:55 AM