Amravati | वीज कनेक्शन तोडायला आलेल्या कर्मचाऱ्यांना फटके मारा, तुपकरांचं वादग्रस्त विधान

| Updated on: Nov 08, 2021 | 10:40 AM

रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले तर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून मारा, त्यावेळी काही अडचण आली तर कधीही फोन करा”, असं वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी केलं आहे. अमरावतीमधल्या पत्रकार परिषदेत बोलताना तुपकर चांगलेच आक्रमक झाले होते.

शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा महावितरण कंपनीने सपाटा लावला आहे. आता रब्बी हंगाम सुरू आहे त्यामुळे या रब्बी हंगामात जर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने कापले तर महावितरण कार्यालय जाळण्यास देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असंही रविकांत तुपकर म्हणाले.