Bhaskar Jadhav | सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर बिनशर्त माफी मागतो : भास्कर जाधव

Bhaskar Jadhav | सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर बिनशर्त माफी मागतो : भास्कर जाधव

| Updated on: Dec 22, 2021 | 3:11 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून, या सर्व प्रकरणावर माफी मागितली. पंतप्रधानांबद्दल केलेले वक्तव्य मी मागे घेतो, तसेच माझे अंगविक्षेपही मागे घेतो, असे ते म्हणाले.

विधानसभेत नितीन राऊत यांनी एका विषयासंबंधी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढू, नागरिकांना 15-15 लाख रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं, असं वक्तव्य केलं. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाला आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं आश्वासन कधीही दिलच नव्हतं, असा दावा फडणवीस यांनी केला. या लक्षवेधीशी पंतप्रधानांचा संबंध नसतानाही तो विषय काढणं हे आम्ही सहन करणार नाहीत.” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, 2014 साली देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणले, ‘काला धन लाने का है की नही लाने का… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. यु ही रखने का.. ‘. अशा प्रकारे नक्कल करताना त्यांनी अंगविक्षेपही केला.