नौटंकीने पाणी मिळणार असेल तर आम्हीही मोर्चात सहभागी होऊ- इम्तियाज जलील

नौटंकीने पाणी मिळणार असेल तर आम्हीही मोर्चात सहभागी होऊ- इम्तियाज जलील

| Updated on: May 23, 2022 | 3:15 PM

शहराची पाणी पट्टी कमी करून आणि हंडा मोर्चासारखी नौटंकी करून औरंगाबादकरांना खरंच पाणी मिळणार असेल तर मीसुद्धा मोर्चात सहभागी होईन, अशी संतप्त प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM Imtiaz Jaleel) यांनी दिली.

शहराची पाणी पट्टी कमी करून आणि हंडा मोर्चासारखी नौटंकी करून औरंगाबादकरांना खरंच पाणी मिळणार असेल तर मीसुद्धा मोर्चात सहभागी होईन, अशी संतप्त प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM Imtiaz Jaleel) यांनी दिली. शहरातील पाणी समस्येवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेविरोधात आज भाजपतर्फे विराट मोर्चा (BJP Morcha) काढला जात आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. शहरातील हजारो महिला रिकामे हंडे घेऊन या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.