पुण्यातले बेकायदेशीर पब-बार टार्गेटवर, शहाणे समजता का? लाज वाटत नाही, धंगेकर कुणावर भडकले?
पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं. राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर ५० खोके असं लिहिलं होतं. यासोबत ५०० रूपयांच्या बनावट नोटा घेऊन घोषणा दिल्यात.
पुण्यातील कार अपघातानंतर पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार टार्गेटवर आले आहेत. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट हफ्ते वसुलीची यादी वाचून दाखवली. यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बार विरोधात कारवाईची मागणी करत रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं. राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो असलेल्या एका खोक्यावर ५० खोके असं लिहिलं होतं. यासोबत ५०० रूपयांच्या बनावट नोटा घेऊन घोषणा दिल्यात. हा पैशांचा खोका घेऊन रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागात धडकले आणि पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवरच भडकले. इतकंच नाहीतर पुण्यात बेकायदेशील पब आणि बार सुरू असल्याचा आरोप रवींद्र धंगेरकर यांनी केला… बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट