‘… तर मी मुख्यमंत्री झालो असतो’, उद्धव ठाकरे यांनी काय केलं आक्रमक भाष्य?
VIDEO | कोर्टानं लक्तरं काढल्यानंतर तरी शिंदे यांनी राजीनामा द्यावा, उद्धव ठाकरे यांची आक्रमक मागणी
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, काही जणांनी काल आनंदोत्सव साजरा केला. भाजपने आनंद साजरा केला ते समजू शकतो. कारण डोईजड झालेलं ओझं उतवरण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. पण गद्दारांना आनंद होण्याची गरज काय? असा खोचक सवाल करत उद्धव ठाकरे यांनी एक मागणीही केली. ते म्हणाले, काल जीवदान मिळालं ते तात्पुरतं आहे. कोर्टाने अध्यक्षांना रिझनेबल टाइम दिला आहे त्याला सुद्धा मर्यादा आहेत. सुरू असलेली महाराष्ट्राची अवहेलना थांबविली पाहिजे. जसं मी माझ्या नैतिकतेली धरून राजीनामा दिला. तसंच बेकायदेशीर सरकारने राजीनामा दिला पाहिजे. मी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्री झालो असतो. पण मला त्यात स्वारस्य नव्हतं. मी दिलेलं आव्हान आजही कायम आहे, कोर्टाने लक्तरे धिंडवडे काढल्यानंतर निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. आता लोकशाहीत जनतेच्या न्यायालयात जायला काय हरकत नाही. हा फैसला जनतेवर सोडून जनतेचा कौल आम्ही स्वीकारू पण एकनाथ शिंदे यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.