Raigad Rain Update : बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस... कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने शहरातील छोटा पुलावरून पाणी गेल्याने छोटा पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. पर्यायी मोठ्या पुलानी वाहतूक सुरू आहे नदीकाठच्या गावाना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी या दोन्ही नद्यांनी पाणी पातळी, इशारा पातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने शहरातील छोटा पुलावरून पाणी गेल्याने छोटा पुल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. पर्यायी मोठ्या पुलानी वाहतूक सुरू आहे नदीकाठच्या गावाना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. तर सावित्री नदी (महाड) उल्हास नदी (कर्जत). गाढी नदी (पनवेल) या तिन्ही नद्यांची पाणी पातळी इशारा पाणी पातळी पेक्षा कमी असल्याची माहिती आहे. तर रायगड जिल्ह्यातील नागोठण्यात गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस होत असल्याने पुराचे पाणी शिरले आहे. नागोठणे बस स्थानकाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. आंबा नदीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली असल्याने बाजारपेठेत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.