पुण्यातलं सिंहगड पाण्याखाली कसं गेलं? कोणतंही अलर्ट नाही तरीही कंबरेएवढं पाणी अन् रस्त्याची नदी
पुण्यातील एकता नगर आणि निंबज परिसरात बोटीनं नागरिकांना रेस्क्यू करण्याची वेळ आली. सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. रेस्क्यूसाठी आधी एनडीआरएफ आणि आर्मीचं पथक देखील पोहोचलं. काही ठिकाणी सहा ते आठ फुटांपर्यंत पाणी पोहोचलं. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरलं अन्....
पुण्यात काल मुसळधार पावसामुळे अक्षरश: हाहाकार पाहायला मिळाले. एकीकडे पुण्यात धोधो पाऊस आणि दुसरीकडे खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने पुण्यातील अनेक भागात कंबरेपर्यंत पाणी भरलं. पुण्यातील रस्ते नद्या झाल्यात. सिंहगड परिसरात माणसं बुडतील इतकं पाणी भरलं, वाहनं पाण्याखाली गेली. पुण्यातील एकता नगर आणि निंबज परिसरात बोटीनं नागरिकांना रेस्क्यू करण्याची वेळ आली. सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. रेस्क्यूसाठी आधी एनडीआरएफ आणि आर्मीचं पथक देखील पोहोचलं. काही ठिकाणी सहा ते आठ फुटांपर्यंत पाणी पोहोचलं. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरलं. यासह मावळ, भोर, वेल्हा, हवेली येथेही जोरदार पाऊस झाला. रात्री खडकवासला धरण भरल्याने पाणी सोडावं लागलं. पण यानंतर एकच प्रश्न समोर येतोय तो म्हणजे सिंहगड परिसर पाण्याखाली का गेला? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Jul 26, 2024 10:55 AM
Latest Videos