Maharashtra Weather Update : कोकणाला पावसानं झोडपल्यानंतर रायगडला रेड अलर्ट, इतर जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा अंदाज काय?
जोरदार झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. यामुळे कोकण रेल्वे देखील ठप्प झाली होती. तब्बल २७ तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली आहे. अशातच हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, खेड या भागाला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या जोरदार झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. यामुळे कोकण रेल्वे देखील ठप्प झाली होती. तब्बल २७ तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली आहे. अशातच हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. यासह मुंबई, ठाणे, पालघर आणि सातारा या जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड येथील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत होती. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने नदीची पात्रता कमी आहे. आज रायगड जिल्ह्यातील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय.