Maharashtra Weather Update : पुढील चार दिवस कसा होणार पाऊस? हवामान खात्यानं म्हटलं, येत्या 4 दिवसांत…
मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढल्यानंतर आता महाराष्ट्रात पावसाचा जोर ओरल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी पश्चिम महाराष्ट्रात इशारा पातळी ओलांडणाऱ्या नद्यांची पाणी पातळी घटली आहे. दरम्यान, राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची चिन्ह असून येत्या ४ दिवसात मराठवाड्यात मध्यम तर काही ठिकाणी...
महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढल्यानंतर आता महाराष्ट्रात पावसाचा जोर ओरल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी पश्चिम महाराष्ट्रात इशारा पातळी ओलांडणाऱ्या नद्यांची पाणी पातळी घटली आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी आता ओसरताना दिसतेय. काही ठिकाणी खबरदारी म्हणून प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर केले आहे. दरम्यान, राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची चिन्ह असून येत्या ४ दिवसात मराठवाड्यात मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. आजपासून गुरूवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांना मुसळधार पावसापासून काहिसा दिलासा मिळाला आहे.
Published on: Jul 29, 2024 11:55 AM
Latest Videos