रत्नागिरीत तुफान पाऊस, ‘जगबुडी’चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला, हवामान खात्याचा अलर्ट काय?
Ratnagiri Rain : हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून जगबुडी नदी ही इशारा पातळीच्यावर पोहोचली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस होतोय. त्यातच किनारपट्टी भागातील समुद्रही खवळलेला दिसतोय. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, कोकणात पुढील काही दिवस जोरदार पाऊस कोसळणार असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अशातच हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून जगबुडी नदी ही इशारा पातळीच्यावर पोहोचली आहे. जगबुडी नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीतील पाणी रस्त्यांवर आले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर रस्ते, मार्केट आणि पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील पावसामुळे काही गावांचे संपर्क तुटले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेंचं वातावरण आहे.