राज्यात धुव्वाधार… कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? IMD चा अंदाज काय? कुठल्या भागात शाळांना सुट्टी?
Maharashtra Rain Update : गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सखळ भागात पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहे. तर सखल भागात पाणी भरलं असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून या भागातील शाळांना सुट्टी जा हीर करण्यात आली आहे.
राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय. मुंबई आणि मुंबई उपनगर, कल्याण, ठाणे यासह कोकणातील काही जिल्हयात मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणदाण उडवली आहे. गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सखळ भागात पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहे. तर सखल भागात पाणी भरलं असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यासोबतच रायगड, महाड, पोलादपूर आणि माणगावात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यभरात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाकडून नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत आणि गोंदिया या भागातील शाळांना सुट्टी जा हीर करण्यात आली आहे.
Published on: Jul 22, 2024 12:27 PM
Latest Videos