रायगडमध्ये पुढील काही तासांत धुव्वाधार, ‘या’ नद्या इशारा पातळी ओलांडणार? हवामान खात्याचा इशारा काय?
रायगडमध्ये आज कमी झालेला पहायला मिळतोय. माञ नद्यांच्या पातळीत वाढ कायम आहे महाडमधील सावित्री नदी आणि रोहा मधील कुंडलिका नदी या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास या नद्या आपली धोका पातळी पुन्हा ओलांडण्याची शक्यता...
कालपासून कोसळत असलेला मुसळधार पावसाचा जोर रायगडमध्ये आज कमी झालेला पहायला मिळतोय. माञ नद्यांच्या पातळीत वाढ कायम आहे महाडमधील सावित्री नदी आणि रोहा मधील कुंडलिका नदी या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास या नद्या आपली धोका पातळी पुन्हा ओलांडण्याची शक्यता आहे. सध्या रायगड मध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. येत्या तीन ते चार तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर हवामान खात्याकडून रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शहरांतील नागरीकांना सतर्क राहण्यास प्रशासनाकडून सांगण्यात येतंय, तर दूसरीकडे एन डी आर एफ चे जवान देखील या भागात लक्ष ठेऊन आहेत. रायगड, नागोठणे येथील आंबा नदी पात्रात पाणी सहा मिलिमीटर एवढ भरलं आहे. इशारा पातळी ही नऊ मिलिमीटर एवढी आहे. रायगडमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण असून सेसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय. अशातच हवामान खात्याकडून पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.