Maharashtra Weather Update : पुन्हा कोसळधार, राज्यात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपणार; काय म्हणतंय हवामान खातं?
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने काहिशी उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले असताना आता पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत आहे. कोणत्या जिल्ह्यात कसा होणार पाऊस? हवामान खात्याने कुठे कोणता दिला अलर्ट?
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे कमबॅक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने काहिशी उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले असताना आता पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत आहे. सातारा, पुणे, पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे या शहरांना देखील ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला असून तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पुढील २४ तासांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.