Kokan Weather Update : रत्नागिरीत तुफान पाऊस, हवामान खात्यानं कोकणाला काय दिला अलर्ट?
कोकणात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील नद्या नाले प्रचंड दुथडी भरून वाहताना दिसताय. तर पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
सकाळपासून रत्नागिरीत पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकणात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील नद्या नाले प्रचंड दुथडी भरून वाहताना दिसताय. तर पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाच्या दमदार सरींमुळे सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून हवामान खात्याने कोकणाला आँरेज अलर्ट जारी केला आहे. जूनपासून आजपर्यत चिपळूण तालुक्यात सर्वांधिक पाऊस कोसळ्याची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जूनपासून आजपर्यंत ६०० मिलिमीटरची सरासरी ओलांडली आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर पोहोचली आहे. पातळी वाढली असली तरी नागरी वस्तीला कोणताही धोका नसल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Jun 27, 2024 06:19 PM
Latest Videos