Maharashtra Monsoon Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास मुंबईसाठी कसे? IMD चा अंदाज काय?
Imd Monsoon Rain Forecast Maharashtra Weather Latest Update मुंबईसह उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील २४ तास मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण राहणार आहे.
पुढील २४ तास मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण राहणार आहे. सध्या दादर परिसरात देखील ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे. मुंबईसह उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबईत हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यासह विदर्भात देखील यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेला आहे. हलक्या स्वरूपाचा मुंबईत पाऊस होऊ शकतो असा देखील अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. तर अद्याप मुंबईकरांना जोरदार पावसाची काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक

75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
