Maharashtra Weather Update : मोठी बातमी… राज्यात पुढील 48 तास अतिवृष्टी, ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवमान विभागाकडून पुढील ४८ तास राज्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभाागाने दिला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे बऱ्याच प्रतिक्षेनंतर मुंबईत मान्सूच एन्ट्री झाली आहे
राज्यभरातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसाने मुंबईसह पुण्याला चांगलंच झोडपलं आहे. चांगलाच पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. तर काही बैठ्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्याचेही पाहायला मिळाले. अशा परिस्थितीमध्ये हवमान विभागाकडून पुढील ४८ तास राज्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभाागाने दिला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे बऱ्याच प्रतिक्षेनंतर मुंबईत मान्सूच एन्ट्री झाली आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील पाच दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. ही माहिती देताना हवामान खात्याने मुंबईतील पावसासंदर्भात यलो अलर्ट देखील दिला आहे.
Published on: Jun 09, 2024 12:26 PM
Latest Videos