Kokan Weather Update : कोकणाला पावसानं झोडपलं, किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट काय?

Kokan Weather Update : कोकणाला पावसानं झोडपलं, किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट काय?

| Updated on: Jun 25, 2024 | 1:03 PM

हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तर कोकणासह घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. तर कोकणाला ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाने जारी केला आहे, तर गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

कोकणासंदर्भात हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तर कोकणासह घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. तर कोकणाला ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाने जारी केला आहे, तर गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढलं आहे. दरम्यान, o1 जूनपासून ते आजपर्यंत पाचशे मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक वाढला असल्याने समुद्र देखील खवळलेला आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसासह कोकण किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे.

Published on: Jun 25, 2024 01:01 PM