Maharashtra Rain Forecast : राज्यभरात संततधार सुरूच, कोणत्या जिल्ह्यात कसा होणार पाऊस, IMD चा अलर्ट काय?

Maharashtra Rain Forecast : राज्यभरात संततधार सुरूच, कोणत्या जिल्ह्यात कसा होणार पाऊस, IMD चा अलर्ट काय?

| Updated on: Jun 30, 2024 | 12:25 PM

हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. तर हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागामध्ये नागरिकांना जाण्यास प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे

मुंबई आणि मुंबई उपनगरात सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने काहिशी उसंत घेतली आहे. तर मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. तर हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागामध्ये नागरिकांना जाण्यास प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. आज मुंबई शहरात ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. यासह मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरला हवामान खात्याने यल्लो अलर्ट जारी केला आहे.

Published on: Jun 30, 2024 12:25 PM