Maharashtra Rain Forecast  : राज्यभरात पावसाची बॅटिंग, 'या' जिल्ह्याला IMD चा कोणता अलर्ट? कुठे कसा कोसळणार पाऊस?

Maharashtra Rain Forecast : राज्यभरात पावसाची बॅटिंग, ‘या’ जिल्ह्याला IMD चा कोणता अलर्ट? कुठे कसा कोसळणार पाऊस?

| Updated on: Jun 28, 2024 | 12:22 PM

मुंबई, ठाणे आणि पालघरला हवामान विभागाने ग्रीन अलर्ट जारी केला आहे. यामुळे मुंबईतील वातावरण सकाळपासूनच ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी- कोकणात पुढील चार दिवस अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यासह रात्रभर पावसाची संततधार पाहायला मिळाली. रात्रभर पडलेल्या संततधार पावसाने आज पहाटेपासूनच उसंत घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. अशातच मुंबई, ठाणे आणि रायगडला मुसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासह पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघरला हवामान विभागाने ग्रीन अलर्ट जारी केला आहे. यामुळे मुंबईतील वातावरण सकाळपासूनच ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी- कोकणात पुढील चार दिवस अति मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्र ते केरळ अशा अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे रविवारपर्यंत कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा तर दक्षिण कोकणाला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Published on: Jun 28, 2024 12:22 PM