Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात धुव्वाधार… कुठे कसा होणार पाऊस? IMD ने तुमच्या जिल्ह्याला कोणता दिला अलर्ट?
काल मुंबईसह मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ह, रत्नागिरीला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं. त्यानंतर हवामान खात्यानं राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्यानं कोणत्या जिल्ह्यांना कोणता दिला अलर्ट? तुमच्या जिल्ह्यात कसा होणार पाऊस बघा व्हिडीओ
राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस होतोय. काल मुंबईसह मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ह, रत्नागिरीला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं. त्यानंतर हवामान खात्यानं राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या सहा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्याचबरोबर IMD कडून ठाणे, पालघर, अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासबोतच पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईमधील शाळा-महाविद्यालयांना अतिवृष्टीच्या अलर्टमुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.