भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी… नागरिकांची कसरत, ‘या’ भागात गुडघाभर पाणी
भिवंडी शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सकल भागामध्ये पाणी साचले आहे. भिवंडी शहरातील भाजी मार्केट, तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. बघा नेमकं कुठे साचलं पाणी
भिवंडी शहरात कधी हलक्या तर मध्येच जोरदार पाऊस होतोय. काल रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहरात हाहाकार उडला आहे. भाजी मार्केट, नझराणा सर्कल, तीन बत्ती, मंडई, शिवाजी चौक या भागात गुडघाभर पाणी साचले. भिवंडी शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सकल भागामध्ये पाणी साचले आहे. भिवंडी शहरातील भाजी मार्केट, तीनबत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. भिवंडीतील भाजी मार्केटमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आणि मार्केटमध्ये भरलेल्या पाण्यामुळे नागरिकांना वाट शोधत आपलं घरं गाठावं लागत आहे. भिवंडी शहरात असाच मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक घर आणि दुकानांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.
Published on: Jul 20, 2024 01:03 PM
Latest Videos