Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? हवामान खात्याचा बघा अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? हवामान खात्याचा बघा अंदाज

| Updated on: Jul 18, 2024 | 12:37 PM

Imd Monsoon Rain Forecast Weather Latest Update : मुंबई आणि उपनगर, कल्याण, ठाणे, डोंबिवली येथेही पावसाला रिपरिप पाहायला मिळत आहे. मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगर, कल्याण, ठाणे, डोंबिवली येथेही पावसाला रिपरिप पाहायला मिळत आहे. मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर या मुसळधार पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गाची वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहे. मुंबईला यलो, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरीला रेड अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे.

Published on: Jul 18, 2024 12:37 PM