Maharashtra Weather Update : रत्नागिरीला रेड तर 'या' 11 जिल्ह्यांना IMD चा ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस?

Maharashtra Weather Update : रत्नागिरीला रेड तर ‘या’ 11 जिल्ह्यांना IMD चा ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस?

| Updated on: Jul 15, 2024 | 11:38 AM

Maharashtra Weather Latest Update Today : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खेड, चिपळूण, दोपाली यासह कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी भरलं असून रस्त्याची नदी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोकणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खेड, चिपळूण, दोपाली यासह कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी भरलं असून रस्त्याची नदी झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिली आहे. यामध्ये पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसाच्या शक्यतेनंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्यासह खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

Published on: Jul 15, 2024 11:38 AM