Maharashtra Rain Alert : पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार पावसानं उडणार नागरिकांची दाणादाण?

राज्यात मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यात पुढील ३ ते ४ दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भासह इतर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

Maharashtra Rain Alert : पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार पावसानं उडणार नागरिकांची दाणादाण?
| Updated on: Sep 24, 2024 | 12:05 PM

कोकण, मराठवाडा, विदर्भात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या मंगळवारपासून पुढील ४ दिवस वादळी पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला असून मान्सून आता गुजरातमधील कच्छ भागापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा २४ तासांत तयार होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. परिणामी राज्यातील अनेक भागात मुसळदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात यलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेडकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.

Follow us
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट
एक 'नाथ', एक न्याय...,अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर नरेश म्हस्केचं ट्वीट.
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?
Maharashtra Rain: पुढील चार दिवस वादळी पाऊस, कोणत्या भागात मुसळधार?.
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?
लोकलमध्ये कर्कश्श जाहिरातींचा तुम्हालाही त्रास? प्रवाशांची मागणी काय?.
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं...
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर कसा? पोलिसांनी सांगितलं....
हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला...
हाके आक्रमक; मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे, औकातीत बोला....
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?
'वय झालंय, बुड्ढा सठिया गया', खडसेंवर कोणाची जिव्हारी लागणारी टीका?.
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?
... तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; पडळकर काय म्हणाले?.
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?
राज ठाकरेंची शिंदेंसोबत बंद दाराआड 20 मिनिटं बैठक, कशावर झाली चर्चा?.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसेचा बडा नेता लढणार? ठाण्यात मोठी खेळी.