Weather : मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather : मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

| Updated on: Jan 22, 2022 | 10:42 AM

मुंबई, ठाण्यात आज पावसाचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. वातावरणात कमालीचे बदल झाले आहेत, सध्या मुंबईचं तापमान हे 21अंश सेल्सिअस आहे. या वातावरणामुळे मुंबईत धुरकट वातावरण निर्माण झालंय.

मुंबई, ठाण्यात आज पावसाचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. वातावरणात कमालीचे बदल झाले आहेत, सध्या मुंबईचं तापमान हे 21अंश सेल्सिअस आहे. या वातावरणामुळे मुंबईत धुरकट वातावरण निर्माण झालंय. अवकाळी पावसामुळे सध्या दिवसातील तिन्ही प्रहरांत विचित्र वातावरण अनुभवायला मिळत आहे.  कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी देखील मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक अशा काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसांनंतर राज्यातील किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरण अपेक्षित आहे.