Maharashtra Weather Update : कोकण-विदर्भाला मुसळधार पाऊस झोडपणार, 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Weather Update : कोकण-विदर्भाला मुसळधार पाऊस झोडपणार, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

| Updated on: Jul 28, 2024 | 12:06 PM

राज्यातील पुणे, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई या भागात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढले आहे. मुसळधार पवासामुळे शाळा, महाविद्यालयांना देखील काही जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अशातच आता हवामान खात्याने कोकणासाठी इशारा दिला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील पुणे, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई या भागात मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढले आहे. मुसळधार पवासामुळे शाळा, महाविद्यालयांना देखील काही जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अशातच आता हवामान खात्याने कोकणासाठी इशारा दिला आहे. कोकण आणि विदर्भ या ठिकाणी आज दिवसभर जोरदार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाकडून कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रायगड आणि साताऱ्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासह पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापुरला आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे बुलढाणा, अकोला, वाशिक यवतमाळ याठिकाणी देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भंडरा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Published on: Jul 28, 2024 12:05 PM