माणसांप्रमाणे पशुपक्षांनाही मान्सूनची प्रतिक्षा, शेतात मोराची मनसोक्त भटकंती
VIDEO | मान्सूच्या आगमनाच्या प्रतिक्षेत मोराची शेतात मनसोक्त भटकंती, बघा व्हिडीओ
नांदेड : मृग नक्षत्राचा पहिला दिवस कोरडाच गेलाय, त्यामुळे नांदेडमध्ये उष्णतेच्या झळानी त्रस्त झालेल्या नागरिकांना मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागलीय. तर शेत, शिवारात राष्ट्रीय पक्ष असलेल्या मोराची देखील भटकंती पाहायला मिळतेय, पाऊस आल्यानंतर पिसारा काढून नाचणारा मोर सध्या मात्र मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करत फिरताना दिसतोय. यंदा मान्सून काहीसा लांबत चालल्याने मानवाप्रमाणे पशुपक्ष्याची घालमेल वाढलेली दिसतेय. आज राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यापूर्वीच राज्यात आज मान्सूनपूर्व पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. उन्हाच्या कडाक्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आहे. अशातच नैऋत्य मौसमी वारे काल केरळमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे पावसाला पोषक परिस्थिती असल्याने येत्या ४८ तासांत राज्यात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.