पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली…
पुण्यात पावसाने अगदी कहर केला आहे. पुण्यातील खडकवासला आणि मुळशी धरण संपूर्ण भरल्याने धरणाचे दरवाजे खुले झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पुण्यात लष्कराला पाचारण करण्याची वेळ आली आहे. आळंदीला जोडणारा पुल 18 वर्षांनंतर पाण्याखाली गेला आहे.
पुणे जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. पुण्यातील पूर परिस्थितीला हाताळण्यासाठी लष्कराला पाचारण केले आहे. पुण्यातील पूरस्थितीमळे हजारो नागरिक अडकून आहेत. शहरातील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. खडकवासला, मुळशी धरण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पुण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आहे. पुण्यात वीजेचा शॉक लागून तीन तरुणांचा मृत्यू देखील झाला आहे. तर लव्हासा येथे दरड कोसळली आहे. तब्बल 18 वर्षांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. त्याम जर पाऊस असाच कोसळत राहीला तर संत ज्ञानेश्वर माऊलीचे मंदिरात पाणी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भक्ती सोपान पुल देखील पाण्यात गेला आहे. पाऊस इंद्रायणी उगम पावते त्याच ठिकाणी 370 मिमी पाऊस झाला आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवड,देहू आळंदी भागाला पावसाचा मोठा फटका बसला आहे.