Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update IMD : कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, अवकाळीचा धोका अन् 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट

Weather Update IMD : कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण, अवकाळीचा धोका अन् ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट

| Updated on: Mar 31, 2025 | 11:06 AM

वादळी वाऱ्यासह पावसाच्या इशाऱ्यामुळे शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला लागून उभ्या आहेत. दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा परिणाम खोल समुद्रातील मासेमारीवर झाला असून बहुतांश मच्छीमारी बोटी बंदरात उभ्या आहेत.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरता भारतीय हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या आरबी समुद्र किनार पट्टीच्या भागात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत असून कोकण किनारपट्टी भागात कोणत्याही क्षण जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस आवकाळी पावसाचे ढग किनारपट्टी भागात असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोकणात ढगाळ वातावरण असल्याने आणि अवकाळी पावसाची शक्यता असल्याने याचा फटका आंबा पिकाला होऊ शकतो. त्यामुळे बळीराजा या अवकाळी पावसाच्या इशाऱ्याने चिंतेत असल्याचे पाहायला मिळतंय. पुढचे दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात ढगाळ हवामान असल्याचे पाहायला मिळणार आहे. यासह ताशी ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण असलं तर मात्र राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे.

Published on: Mar 31, 2025 11:06 AM